आजगाव प्रशालेस माजी विद्यार्थ्यांकडून बाकं भेट..!

सावंतवाडी,दि.६ फेब्रुवारी

तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेच्या १९८८ च्या इयत्ता दहावी बॅचकडून नुकत्याच झालेल्या स्नेह मेळाव्यात प्रशालेला बेंच देण्याचं आश्वासन दिले होते. त्याची आज या माजी विद्यार्थ्यांनी बारा बेंच देऊन पूर्तता केली आहे.
त्यामध्ये गुरुनाथ नातू, दत्तप्रसाद प्रभू , विवेक पांढरे, उदय पांढरे, अविनाश जोशी या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
या कामाबद्दल शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये , प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, शिक्षिका काव्या साळवी, मानसी परूळेकर यांनी या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
तसेच या विद्यार्थ्यांचा इतरही माजी विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन आपल्या हक्काच्या शाळेला विविध भौतिक सुख सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आश्वासन केले आहे.