समुहगान,ज्ञानी मी होणार ,खोखो व कबड्डीच्या सघांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड
तळेरे,दि.२४ डिसेंबर
तळेरे प्रभागस्तरीय शालेय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सावा अंतर्गत विविध स्पर्धेत
पी.एम.श्री जि.प.आदर्श शाळा तळेरे नं.१ शाळेने घवघवीत यश संपादन केले असून प्रशालेच्या कबड्डी व खोखो सघांची तसेच लहानगट समुहगान व लहानगट “ज्ञानी मी होणार”, गोळा फेक, ५० मी धावणे प्रकारात प्रशालेची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे-
कु.आशिता माने- गोळा फेक प्रथम, कु. कोमल कोकरे- १००मी धावणे तृतीय,
५०×४ तळेरे -नं-१ संघ -द्वितीय,
कु.किर्तिका पांचाळ ५० मी धावणे – द्वितीय आली आहे. लहान गट समूहनृत्य- उपविजेता, लहान गट समूहगान- विजेता ज्ञानी मी होणार लहानगट- विजेता ठरला आहे. या दोन्ही गटांची तसेच प्रशालेचा कबड्डी संघ व खो-खो संघ
प्रभागस्तरीय स्पर्धेत विजेता ठरला असून या दोन्ही संघाची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना पीएम श्री जि.प.आदर्श शाळा तळेरे नं.१शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर,शाळेचे सर्व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे .
या गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती तळेरे नं.1 चे अध्यक्ष राजेश जाधव,श्रीम.अनुष्का अजित गोसावी ,(उपाध्यक्ष),सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी तसेच
तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर
उपसरपंच श्रीम. रिया चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापती (प.स कणकवली) दिलीप तळेकर,तळेरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, तळेरे गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच शिक्षणप्रेमी शशांक तळेकर, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे सर्व पालक वर्गांनी अभिनंदन करुन तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.