मालवणात ५ रोजी रक्तदान शिबीर

मालवण,दि.२४ डिसेंबर

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने ‘रक्तदान महायज्ञ’ या रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मालवण मेढा येथील दैवज्ञ भवन हॉल येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे करण्यात आले आहे.