जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा शालेय गटा साठी आज पासून जिमखाना बॅडमिंटन हॉल सावंतवाडी येथे सुरू

सावंतवाडी,दि.२४ डिसेंबर

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा शालेय गटा साठी आज पासून जिमखाना बॅडमिंटन हॉल सावंतवाडी येथे सुरू झाल्या.याचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री सागर साळुंके यांच्या हस्ते झाले.
यावेळी रोटरी चे अध्यक्ष श्री प्रमोद भागवत, अनंत उचगावकर,रो. सुबोध शेलाटकर,श्री नंदकुमार प्रभुदेसाई.श्री शेख.श्री केतन आजगावकर.कु.मयुरी भगत,हे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धा स्नेह नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी.रोटरी क्लब सावंतवाडी, व् मोर्निग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या तर्फे भरवण्यात आले आहे.श्री सागर साळुंके यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात,खेळाडूंना प्रोत्साहन देणे साठी सर्व सहकार्य देण्याचे मान्य केले. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी केतन आजगावकर यांनी आभार मानले.