देवगडात १० जानेवारी पासून ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला आयोजन!

देवगड,दि.२४ डिसेंबर 
देवगड तालुक्याचे सुपुत्र, आद्यपत्रकार ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणार्थ देवगड येथे उमाबाई
बर्वे लायब्ररी, स्नेहसंवर्धक मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय
‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे १४ वे वर्ष
असून दि. १०, ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी तीन दिवस ही व्याख्यानमाला रोज सायं. ६ ते ८ वा. या वेळेत बर्वे
लायब्ररी समोरील स्नेहसंवर्धक मंडळाच्या पटांगणात होणार आहे.अशी माहिती उमाबाई बर्वे लायब्ररी अध्यक्ष डॉ गुरुदेव परुळेकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.या प्रसंगी या व्याख्यान मालेचे समनवयक ऍड अजित गोगटे,उपाध्यक्ष डॉ भाई बांदकर,प्रशांत बांदकर सौ उत्तरा जोशी स्नेहसंवर्धक अध्यक्ष चारुदत्त सोमण,महेश खोत उपस्थित होते या व्याख्यान मालेच्या निमित्ताने दि.९ ते १३ जाने.२०२५ या कालावधीत शब्दांगण पुणे यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.असेही डॉ परुळेकर यांनी सांगितले.
या व्याख्यानमालेसाठी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले यांचे शुक्रवार दि. १० जानेवारी
रोजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) : भविष्यातील आव्हाने व संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
श्री गोडबोले मुंबई आय. आय. टी. इंजिनियर आहेत. त्यांचा देश विदेशात सॉफ्टवेअर क्षेत्रात ३२ वर्षाचा अभुनव असून
जगप्रसिद्ध आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये २३ वर्ष सी. ई. ओ. पदावर काम केले आहे. मराठीमध्ये त्यांनी कॉम्प्युटर, विज्ञान,
गणित, संगित, सामाजिक, अर्थशास्त्र, शरीरशास्त्र, रोगविज्ञान, पर्यावरण, प्रवास इ. संशोधनात्मक विषयांवर विपुल
लेखन केले आहे. मुसाफिर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तसेच १००० वर लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक
पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार मिळाले आहेत. पं. भिमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार
गंधर्व पुरस्कार, उद्योगरत्न पुरस्कार आणि पाच वेळा जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत.
शनिवार दि. ११ जानेवारी रोजी ठाणे येथील प्रा. मंदार भानुशे यांचे ‘भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील
आव्हाने व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रा. भानुशे हे मुंबई विद्यापीठामधील
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आहेत तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे
राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन ई केंटेन्ट डेव्हलपमेंटचे समन्वयक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या
उपक्रमाचे ते सबकमिटी मेंबर आहेत.
रविवार दि. १२ जानेवारी रोजी कुडाळ येथील डॉ. प्रसाद देवधर यांचे ‘जागतिक भान असलेली गावे आणि
भगीरथ प्रतिष्ठानचे प्रयोग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. देवधर व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
त्यांनी सन २००४ मध्ये भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या समाजसेवी प्रतिष्ठानातर्फे गावोगावी
बायोगॅस प्लांट सुरू करून जलसंधारण, पिण्याचे शुद्ध पाणी, भाजीपाला लागवड, शालेयस्तरावर स्वछता, महिला
सक्षमिकरण इ. ग्रामीण भागातील कुटुंबांच्या आरोग्याचे आणि सर्वांगीण विकासाचे काम सुरु अहे.
या व्याखानमालेच्यानिमित्ताने दि. ९ ते १३ जानेवारी २०२४ रोजी शब्दांगण, पुणे यांच्या तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन
व विक्रि होणार आहे. तरी जास्तीतजास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा.
तरी रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानांचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन या व्याख्यानमालेचे समन्वयव
माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांनी आणि तीन्हीं संस्थांचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर, चारूदत्त सोमण आणि विद्याधर माळगावकर, यांनी केले आहे.