तळेरे,दि.२४ डिसेंबर
देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात २६ डिसेंबर २०२४ रोजी सात प्रहरांच्या अखंड हरिहर नाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुरंबावडे ग्रामविकास मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सात प्रहरांच्या हरिहर नामसंकीर्तन सप्ताहात सकाळी ७-३० ते १०-०० पर्यंत श्री देव गांगेश्वर व उपांगदेवता यांचे पूजन, अभिषेक इत्यादी होणार आहे. सकाळी १०-०० वाजता सात प्रहराच्या अखंड नामसंकीर्तनाला प्रारंभ होईल. या नामसंकीर्तनात स्थानिक गावीक भजने व निमंत्रित केले बुरंबावडे दशक्रोशीतील भजने यांचा समावेश असणार आहे. रात्री ०८-०० ते १०-०० दरम्यान महाप्रसाद असणार आहे. रात्री ११-०० वाजता मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक चित्ररथ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यादरम्यान सकाळी ११-०० ते दुपारी ०२-०० दरम्यान एस्.एस्.पी.एम्. रुग्णालय, पडवे यांच्या सौजन्याने बुरंबावडे ग्राम विकास मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सदर सप्ताह कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे तसेच रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करून अनमोल सहयोग देण्याचे जाहीर आवाहन बुरंबावडे ग्रामविकास मंडळाने केले आहे.