ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त २५ डिसेंबर रोजी केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार

सावंतवाडी दि.२४ डिसेंबर 
सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे आयोजित केलेल्या ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत.तसेच माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील (चंदगड) व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

ज्ञानदीप मंडळ हे सलग अठरा वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्य करीत आहे जिल्हा स्तरावरील मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार जी मंडळी सामाजिक कार्यात योगदान देतात, त्यांना प्रोत्साहन प्रेरणा मिळावी यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कार्यरत आहे, असे संस्थापक अध्यक्ष वाय पी नाईक यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत ,सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई , गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन उदयकुमार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कर वितरण सोहळ्यात जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कुणकरीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन मडवळ ,कुडाळच्या परफेक्ट अकॅडमीचे राजाराम परब, साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार, सौ.प्रा. सुमेधा सावळ (बांदा ),कुडाळचे प्राथमिक शिक्षक संजय बांबुळकर, सावंतवाडीच्या प्राथमिक शिक्षिका मृगाली महेश पालव या उपक्रमशील व्यक्तींचा ज्ञानदीप विकास मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह गौरव पत्र शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे
यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय जिल्हा कार्यवाहक गजानन नानचे (फोंडाघाट ) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख ,खजिनदार शामराव मांगले, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गावस, प्रतिभा चव्हाण, श्रद्धा सावंत यांनी केले आहे.