डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य चुकीचे ; अमित शहांचा संविधानावर राग
कणकवली,दि.२४ डिसेंबर
लोकसभेला भाजपाला 400 पार चा नारा पुर्ण करता आला नाही , त्यामुळे अमित शहांना आलेले अपयश आणि त्यामुळे त्यांना संविधान बदलता आले नाही.त्याचा राग अमित शहा यांना आहे. कॉंग्रेस आणि विरोधी पक्षाने लोकसभा निवडणूकीत फेक नेरिटिव्ह पसवल्याचा आरोप केला जात आहे. मात्र , भाजपाचेच लोक सांगत होते की , संविधान बदलणार त्याचाच प्रचार कॉंग्रेस आणि मित्र पक्षानी केला. लोकसभेत संविधानामुळे अपयश आल्याचा मनात राग धरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे गृहमंत्री अमित शहा यांनी चुकीचे वक्तव्य केले. त्याबद्दल देशभर आंदोलन कॉंग्रेस आणि मित्र पक्षाने घेतले आहे. जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नसतील तर तो पंतप्रधाम मोदी यांनी घ्यावा. अन्यथा, कॉंग्रेसचे आंदोलन सुरु राहणार आसल्याचा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.
कणकवली येथे राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस प्रविण वरुणकर , तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहीबांवकर, तालुका उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, महेश तेली,संदीप कदम आदी उपस्थित होते.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना देशात संविधानाला मानणारे लोक कसे? याबाबत मनात राग आहे. त्यामुळे अमित शहा यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत, हिवाळी अधिवेशनात संसदेत संविधानावर चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शहा यांनी चुकीचे वक्तव्य केलं. ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, त्याच्यात द्वेष दिसून येत आहे.जे लोक डॉ.आंबेडकर यांना देव मानतात,त्यांची मन दुखावली आहेत. संविधानावर चर्चा करावी विरोधी पक्षाने केली होती. महागाई , देशात होत असलेल्या दंगली किंवा अन्य महत्तवाच्या मुद्दायांवर सरकार चर्चा करीत नाही. कॉंग्रेसच्या मागणी नंतर संविधानावर चर्चा करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करुन संविधानावर अमित शहा यांनी राग व्यक्त केल्याचा आरोप इर्शाद शेख यांनी केला.
भारत देश हा खंडप्राय देश आहे. ज्यावेळी ब्रिटिश सरकार गेले त्यावेळी भारत देश 10 वर्षे राहणार म्हटले होते.मात्र, 75 वर्षे झाली तरी हा देश एक राहिला आहे.या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात.विविधता असलेला भारत देश आहे, त्यामुळे भारताचे मजबूत संविधान असून त्यामुळेच देश एक राहिला आहे. मात्र , ते संविधान लिहिणा-या डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल देशाच्या सर्वोच्च सभागृहात अपमानित करणारी वक्तव्य करुन भारतातील सर्वसामान्यांचे मने अमित शहा यांनी दुखावली असल्याचे इर्शाद शेख यांनी म्हटले आहे.
फोटो कॅप्शन –
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत इर्शाद शेख सोबत जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस प्रविण वरुणकर , तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहीबांवकर, तालुका उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, महेश तेली,संदीप कदम आदी.