कणकवली तहसिल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
कणकवली दि.२४ डिसेंबर
ग्राहकांनी बाजारात खरेदी करताना सजग राहण्याची गरज आहे.
ग्राहकाने वस्तू किंवा सेवा खरेदी करताना जागरूकता बाळगली पाहिजे असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
कणकवली तहसीलदार कार्यालय येथे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ते बोलत होते, यावेळी नायब तहसीलदार श्री. वरक, नायब तहसीलदार श्री. कोकरे, पुरवठा अधिकारी, श्रीमती रति घोडके, गोडाऊन मॅनेजर नितीन डाके, जगदीप चाळके,तसेच रेशन धान्य दुकानदार आणि तालुका ग्राहक पंचायत अध्यक्षा श्रद्धा कदम, सल्लागार अशोक करंबेळकर, सचिव पूजा सावंत, सहसचिव विनायक पाताडे, संघटक राजन भोसले, कोषाध्यक्ष सुभाष राणे, नामदेव जाधव, महानंदा चव्हाण, प्रकाश वाळके, चंद्रकांत चव्हाण आदी पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी , पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने आणि ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांची प्रतिमा व ग्राहक पंचायत पुस्तिका कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांना भेट देण्यात आली.
अशोक करंबळेकर म्हणाले , ग्राहकाने खरेदी करताना ग्राहक बनूनच खरेदी करावी वस्तू किंवा सेवा देणाऱ्याचे गि-हाईक बनू नये.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली तालुका अंतर्गत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर ग्राहक पंचायत अध्यक्षा श्रद्धा कदम ग्राहक संरक्षण कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव पूजा सावंत तसेच मंडळ अधिकारी संतोष नागावकर यांनी आभार मानले.