राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार लवकरच करण्यात येणार…

सावंतवाडी दि.२४ डिसेंबर 
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा उद्या बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला नागरी सत्कार लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली. मंत्री नितेश राणे यांची महत्त्वाची बैठक असल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. असे त्यांनी सांगितले.

महेश सारंग म्हणाले, आमदार नितेश राणे राज्याचे मस्य व बंदर विकास कॅबिनेट मंत्री झाले म्हणून त्यांचा नागरी सत्कार भाजप आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दिपक केसरकर चौथ्यांदा आमदार तर कुडाळ मधुन माजी खासदार निलेश राणे आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांचाही सत्कार करण्यात येणार होता.
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक असल्याने वेळ देता येणार नाही त्यामुळे हा नागरी सत्कार लवकरच करण्यात येणार आहे असे महेश सारंग यांनी सांगितले.