श्रीराम वाचन मंदिर मध्ये वाडकर कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण

सावंतवाडी दि.२४ डिसेंबर
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या संस्थेच्या वतीने पु. माने गुरुजीच्या जयंती निमित्त स्व. द. कृ. वाडकर यांनी ठेव ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून कथा कथन स्पर्धा आयोजीत करण्यात येते. तसेच श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या वतीने निबंध लेखन स्पर्धा नोव्हेबर मध्ये आयोजित करण्यात आली होती. कथा कथन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील एकूण १८ स्पर्धकानी सहभाग घेतला. तर निबंध लेखन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्यातील ९ स्पर्धकांनी भाग घेतला. गुणानुक्रमे पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

कथा कथन स्पर्धा गट पहिला (इ. ५ वी ते ७ वी) कु. दुर्वा गोविंद सावंत (कोलगाव हायस्कूल, कोलगाव) प्रथम क्रमांक, कु. मैचली मनोहर सावंत (नूतन माद्यामिक विद्यालय, इन्सुली) द्वितीय क्रमांक, कु. आर्यन योगेश चव्हाण (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) तृतिय क्रमांक, कु. सिद्धी बावली गावडे (नूतन माद्यामिक विद्यालय, इन्सुली) उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

कथा कथन स्पर्धा गट दुसरा (इ८ वी ते १० वी)कु. मृणाली मोहन पवार (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) प्रथम क्रमांक,
कु. प्रणाली राजन घाटकर (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) द्वितीय क्रमांक,
कु. अपेक्षा आपा राउळ (कोलगाव हायस्कूल, कोलगाव) तृतिय क्रमांक, कु. आर्या गणपत सावंत (नूतन माद्यामिक विद्यालय, इन्सुली) उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

निबंध लेखन स्पर्धा खुला गट सौ. नियोजिता अनिल नाईक, माजगाव सावंतवाडी प्रथम क्रमांक,श्री. संजीव आत्माराम राऊत, जामसंडे, देवगड द्वितीय क्रमांक,कु. सानिका जगदीश वायंगणकर, सोमवार पेठ, मालवण तृतीय क्रमांक, सतीश सिताराम कदम, कांदळगाव, मालवण उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा यांनी साने गुरुजी जयंती निमित्त कथाकथनाचे औचित्य स्पष्ट करून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष स्व. दत्ताराम वाडकर यांचे व्यक्तिमत्व विषद केले, तर सूत्रसंचालन थी. राजेश मोंडकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष श्री. प्रसाद पावसकर, कार्यवाह श्री. रमेश बोंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. कथा कथन स्पर्धेचे परीक्षण श्री. वाय पी. नाईक आणि श्री. प्रवीण मांजरेकर यांनी केले. तर निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षण मौ. महाश्वेता कुबल आणि श्री राजेश मोंडकर यांनी केले. या प्रसंगी श्री. भरत गावडे यांनी कथाकथन कसे करावे या बाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाचन मंदिरचे ग्रंथपाल श्री. महेंद्र पटेल आणि सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.