सावंतवाडी दि.२४ डिसेंबर
केसरी- धनगरवाडी येथील धुळू मळू डोईफोडे (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा
सिद्धेश धुळू डोईफोडे (१९ ) त्याने सावंतवाडी पोलिसात दिली असून आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
धुळू डोईफोडे हे सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये कामाला होते. मंगळवारी त्यांचा मुलगा सिद्धेश याला त्यांनी घराच्या देवघरात छताच्या वाशाला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने याबाबत आंबोली पोलिसांना खबर दिल्यानंतर सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व मनीष शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
मृत धूळू डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई करीत आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग केसरी- धनगरवाडी येथील धुळू डोईफोडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या