रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाची निविदा पनवेलच्या ठेकेदारांना कोणी दिल्या – परशुराम उपरकर

शासकीय अधिकारी शिस्त व अपील नियमावली 1979 चा सर्वगोड यांनी भंग केला ; निविदा प्रक्रिया केली त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी नाहीत

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मीडियाला दिलेले स्टेटमेंट शासकीय अधिकारी शिस्त व अपील नियमावली 1979 चा सर्वगोड यांनी भंग केला असून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाची निविदा पनवेलच्या ठेकेदारांना कोणी दिल्या ? कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारभाराविरोधात १५ फेब्रुवारी आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रेल्वे स्टेशन सुशोभीकरण ची निविदा पनवेल मधील ठेकेदारांना दिली असून पी डी इन्फ्रा ह्या पनवेल च्या एजन्सी ला कामे दिली आहेत.सावंतवाडी स्टेशन चे काम के. व्ही. पाटील अँड कन्स्ट्रक्शन ला काम दिले. सिंगल टेंडर ला काम देताना फेरनिविदा होणे आवश्यक असते. मात्र तेही केले गेले नाही. रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाची निविदा ३ कोटीहून अधिक असल्याने चीफ इंजिनियर कडे निविदा उघडणे गरजेचे होते. मात्र,श्री. सर्वगोड यांनी आपल्या दालनात ही टेंडर फोडून अधीक्षक अभियंता तिथे उपस्थित असल्याचे दाखवले. मात्र,त्यांची सही नाही.,उपस्थितांमध्ये विभागीय लेखाधिकारी आणि सर्वगोड यांच्या सही आहेत. सर्वगोड टेंडर कसे मॅनेज करतात हे यावरून उघड होत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे कार्यक्षेत्र चार तालुक्याचे असूनही त्यांनी खेड, चिपळूण, रत्नागिरी संगमेश्वर रेल्वे स्टेशन नूतनीकरण ची टेंडर कणकवली कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून कशी काढण्यात आली ? सिंधुदुर्ग चे अधीक्षक अभियंता कार्यालय सुरू झाल्या नंतर त्या पदाचा कार्यभार स्वतःकडे घेण्यासाठी सर्वगोड यांची खटपट आहे. अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार सर्वगोड याना घेऊ देणार नाही.जोपर्यंत कायमस्वरुपी अधीक्षक अभियंता येत नाही,अपूर्ण कर्मचारी येत नाही तोपर्यंत कार्यालय चालू देणार नाही.कार्यकारी अभियंता सर्वगोड हे मनमानी कारभार करत आहेत. त्याविरोधात १५ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले जाईल,असे श्री उपरकर यांनी सांगितले.