गोळवण येथे वातानुकूल शववाहिनीचे लोकार्पण!

मसूरे,दि.२४ डिसेंबर (झुंजार पेडणेकर)

मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायत तर्फे १५ व्या विक्त आयोग मधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वातानुकुलीन शववाहिनीचे लोकार्पण माजी उपसरपंच साबाजी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. प्रारंभी नंदादीप नाईक यांच्या हस्ते शव वाहिनीचे पूजन करण्यात आले.

या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य एकादशी गावडे, प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, भाई चिरमुले, गोळवण आरोग्य विभागाचे औषध निर्माण अधिकारी प्रतापसिह नांगरे, परिचर संजय कांदळकर, आरोग्य सहाय्यक हेमंत चव्हाण, नागरिक बहुउद्देशक सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अनिल गावडे, शेलटकर, भाई चिरमुले, आनंद लोखंडे, प्रमोद पवार, रमेश परब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद परब, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाताडे, बाबुराव चिरमुले, गजानन घाडीगावकर, अनिल घाडी आदी उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते कै. रमेश परब (पेंडूरकर) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.