उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागताचे लावलेले बॅनर मुदत असताना सावंतवाडी पालिका प्रशासनाने काढले

बॅनर उद्यापर्यंत न लागल्यास येथील पालिकेसमोर सावंतवाडीतील शिवसैनिकांना घेऊन आंदोलन करू-तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी,दि.६ फेब्रुवारी

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागताचे लावलेले बॅनर मुदत असताना सावंतवाडी पालिका प्रशासनाने काढले आहेत. मात्र हे बॅनर उद्यापर्यंत न लागल्यास येथील पालिकेसमोर सावंतवाडीतील शिवसैनिकांना घेऊन आंदोलन करू,असा इशारा आज येथे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.उद्धव ठाकरे कृतघ्न, शिवसेनेने मुळे मी आमदार झालो नाही, माझी मते स्वतःची आहेत, असे विधान करणारे दीपक केसरकर म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिवस-रात्र काम केल्यामुळेच ते आमदार झालेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार अर्ज भरावाच.सावंतवाडीची जनता त्यांना योग्य ती जागा दाखवून देईल, असाही टोला त्यांनी लगावला.
श्री राऊळ यांनी आज सावंतवाडी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी त्यांनी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, अशोक परब, आबा सावंत, प्रशांत भोगटे, फिलीप रोडरीक, सुनील गावडे संदेश केरकर आदी उपस्थित होते.
यावेळी राऊळ म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी व फी ची रक्कम भरण्यात आली होती. आजपर्यंत त्याचा कालावधी होता. परंतु काही लोकांच्या दबावा खातर पालिका प्रशासनाने हे बॅनर काढून टाकले. हा प्रकार योग्य नाही. केवळ शिवसेनेला डावलण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पोटदुखीचा प्रकार सुरू आहे. त्यामागे कोणाचा तरी हात आहे. आमचे शहर प्रमुख शैलेश गवंडळकर यांना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी बॅनर काढा, अशा आम्हाला सूचना गेल्या होत्या. त्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रातोरात बॅनर काढण्यात आले. त्या ठिकाणी बॅनर गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण बॅनर काढले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आम्ही मंजुरी व फी ची रक्कम भरली होती, असे सांगितल्यानंतर त्यांनी माफी मागितली व बॅनर पुन्हा लावू, असे सांगितले आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे या प्रकारामध्ये कोणाचा तरी हात आहे. असा आरोप राऊळ यांनी केला. उद्यापर्यंत बॅनर न लागल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी ठाकरे व शिवसेनेवर आरोप करणाऱ्या श्री. केसरकर यांचा त्यांनी समाचार घेतला. केसरकर आमदार होण्यामागे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आणि जनतेचा फार मोठा वाटा आहे सर्व शिवसैनिकांनी त्यावेळी रात्रंदिवस काम करून यांना आमदार केले होते त्यामुळे दीपक केसरकर हे शिवसेनेच्या जीवावरच मोठे झाले आहेत. त्यांना मंत्रीपद याच ठिकाणी मिळाले. परंतु असे असताना ते जर उद्धव ठाकरे वर टीका करत असतील तर आम्ही जास्त काही बोलणार नाही जनतेच्या न्यायालयात त्यांना योग्य ती जागा शिवसैनिक दाखवून देतील आगामी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका दूर नाही. त्यामुळे त्यावेळी त्यांना आपली खरी ताकद कळेल लवकरच निवडणूक होणार आह. त्यावेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरावा आणि आपले नशीब आजमावावे त्यावेळी कोण सरस हे नक्कीच ठरेल. सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली त्या झालेल्या निवडणुकीत एक तरी ग्रामपंचायत शिंदे गटाची निवडून आली का याचा त्यांनी विचार करावा आणि नंतरच आमच्या नेत्यांवर बोलावे केसरकर खोटे बोलून येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत हे आता येथील जनतेला लक्षात आले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केसरकारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल.