नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र जलतरण संघाची ४ व ५ जानेवारीला निवड चाचणी

मालवण,दि.२४ डिसेंबर

उत्तराखंड येथे ३८ व्या नॅशनल गेम्सचे आयोजन २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्याचा जलतरण, वॉटरपोलो, डायविंग संघ निवड दि. ४ व ५ जानेवारी रोजी बालेवाडी पुणे येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना सचिव तथा स्विमिंग फेडरेशन इंडिया निमंत्रक राजेंद्र पालकर यांनी दिली आहे.

या निवड चाचणीत जे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यांनी दि. २ जानेवारी पर्यंत आपली नाव नोंदणी राजेंद्र पालकर मोबा क्र.- ९३२२८६२०६२ यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.