मडुरा हायस्कूलमध्ये ‘सायबर गुन्हे’वर मार्गदर्शन
बांदा,दि.२५ डिसेंबर
मोबाईल व त्याचा अतिरेक यामुळे सायबर गुन्ह्यांची वाढ होताना दिसते. या गुन्ह्यांची व सुरक्षिततेची माहिती विद्यार्थी दशेत झाल्यास पुढील संभाव्य धोके टाळता येतात. विद्यार्थी दशेतच आपण व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्याही चुकीच्या अमिषाला बळी न पडता अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बांदा पोलीस स्टेशनच्या हवालदार अंजली पवार यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेमध्ये सायबर अवेअरनेस व नशामुक्ती समाज या विषयावर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी बांदा पोलीस स्टेशनच्या हवालदार अदिती प्रसादी व मडुरा गावचे पोलीस पाटील मा. श्री नितीन नाईक हे उपस्थित होते.
मुख्याध्यापक सायली परब मान्यवरांचे स्वागत केले. सायबर गुन्हे व नशा मुक्ती यासंदर्भात व्हिडिओ दाखवून त्यांचे विश्लेषण व चर्चात्मक विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा वापर करून हवालदार अदिती प्रसादी यांनी ऑडिओ-व्हिडिओ दाखवले. कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय मुख्यमंत्री मंजुश्री विजय वालावलकर हिने पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गांसाठी भिंतीवरील घड्याळ भेट दिले.
विद्यार्थी जीवनापासून प्रत्येक व्यक्तीने सजग राहून सायबर गुन्हे किंवा नशा यापासून दूर राहिल्यास समाज शुद्ध व निर्मळ राहू शकतो. याची सुरुवात विद्यार्थीदशेपासूनच व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. असे मार्गदर्शन मडुरा गावचे पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले. आभार शिक्षक सुरेश सावंत यांनी मानले.