तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्र शाळा आचरे नं१चे यश

आचरा,दि.२५ डिसेंबर (अर्जुन बापर्डेकर)
मालवण तालुका क्रीडा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या मैदानात सोमवारी संपन्न झाल्या.या स्पर्धेत कबड्डी लहान गट मुलगे गटात केंद्र शाळा आचरे नं१ने प्रथम क्रमांक मिळविला.त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, मुख्याध्यापिका
अनिता पाटील,सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.