मालवणात ऍडव्हान्स ब्युटी कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण,दि.२५ डिसेंबर

बँक ऑफ इंडिया पुरस्कृत, RSETI कुडाळ मार्फत आणि सायली ब्युटीपार्लर मालवण आयोजित १३ दिवसांचा एडव्हान्स ब्युटी कोर्स मालवण रेवतळे येथे संपन्न झाला. हा कोर्स विनाशुल्क आयोजित करण्यात आला होता. या कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून २६ विद्यार्थिनींनी या कोर्समध्ये सहभाग घेतला होता.

दि. ८ ते २० डिसेंबर या कालावधीत हा कोर्स संपन्न झाला. याचे उदघाटन श्री. संदेश कासले यांच्या हस्ते करण्यात आले. या कोर्समध्ये महाराष्ट्र प्रदेश सलून अँड ब्युटीपार्लर असोसिएशनच्या उपाध्यक्ष व सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष तसेच सायली ब्युटीपार्लरच्या संचालिका सौ. सायली मांजरेकर यांनी सहभागी विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. यामध्ये मेकअप, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग, हेअर कट, फेशिअल, प्रोडक्ट नॉलेज आदी शिकविण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींची परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.