देवगड आगाराच्या कारभाराची विभागीय स्तरावर दखल घ्यावी-प्रमोद कांदळगावकर

देवगड,दि.६ फेब्रुवारी

लालपरी ही सर्व- सामान्य प्रवासी वर्गांची जीवन वाहिनी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं असताना कोरोना आणि एस टी च्या कर्मचारी संपामुळे एसटीला खऱ्याअर्थाने घरघर लागली असून गेले कित्येक दिवस देवगड आगाराच्या फलकावर दररोज डझनभर गाड्या रद्द करण्यात आल्याचे नमूद केले जाते आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो असून आपल्या गावातून तहसीलदार, कोर्टात, सार्वजनिक बांधकाम, बँक अशी कामे घेवून आलेल्या प्रवाशांना आपल्या गावी परतण्यास गाड्या उपलब्ध नसल्याने नाहक रिक्षा प्रवास करावा लागतो आहे. खरं तर देवगड म्हटलं की, मासळी, आंबा व्यवसायासाठी परिचित असलेला तालुका पण एसटीच्या लहरीपणाचा फटका मासळी व्यावसायिक महिलांना बसताना दिसतो आहे. उदाहरणार्थ तांबळडेग मिठबाव फोडा गाडी कित्येक वर्षे भारमान देणारी गाडी असून या गाडीवर छोटे व्यापारी, मासळी विकेत्या महिल्या या गाडीवर अवलंबून असताना एक दिवस गाडी पाठवायची आणि आठ दिवस बंद ठेवायची असे धोरण अवलंबिले जात असल्याने एसटीचा प्रवासीवर्ग दूर करण्यास एसटीचे अधिकारी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकार्यांनी निवेदन लक्ष वेधून घेत मागण्या केल्या असता त्यांना आश्वासना पलिकडे हाती काहीच लाभले नाही. पूर्वी कणकवली विभागीय कार्यालयाचा अंकुश होता.तो आता कुठेही दिसून येत नसल्याने देवगड आगाराची अवस्था रामभरोसे चालली असल्याचे पाहायला मिळते आहे. कोरोना काळात आणि एसटीच्या संप संपात नादुरुस्त गाड्या तेवढ्याच दुरूस्ती करून गाड्या पळविण्याचा प्रकार प्रवाशांना जाचक तितक्याच त्रासदायक ठरत आहे. कणकवली विभागीय कार्यालयाचे प्रमुख पाटील यांनी देवगड आगारात काय चाललंय याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नेहमी गाड्या रद्द करून प्रवाशांना वेठीस धरले जाते ते थांबलले पाहिजे अन्यथा एक दिवस प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.अशी स्थिती निर्माण झाली आहे . नेहमी आगारप्रमुख कोणत्याही सभेसाठी बाहेर जात असल्याने सहायक आगारप्रमुख सैतवडेकर प्रवासीवर्गाची बोळवण करतं असून कणकवली विभागीय कार्यालयाचे प्रमुख पाटील यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात तसेच आमदार नितेश राणे यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवगड आगाराच्या कारभाराची विभागीय स्तरावर दखल घ्यावी असे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी मागणी केली आहे.