दोडामार्ग, दि. २५ डिसेंबर
महाराष्ट्र राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यामागे लाडकी बहिणी यांचा मोठा वाटा आहे. लाडक्या बहिणीसीठी सरकारने एकवीसे रूपये देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका या माझ्या माहिती नुसार मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे एकवीसे रूपये जमा होणार आहेत अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी रात्री गडहिंग्लज येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार प्रसंगी बोलताना केली.
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुती, तसेच नगरपंचायत, गडहिंग्लज यांच्या वतीने गडहिंग्लज नगरपालिका येथे हा नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. तसेच आगामी नगरपरिषद निवडणूकीत गडहिंग्लज नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवला पाहिजे असे काम करा आपण सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याबरोबरच विकासाची कामे केली यामुळे आपणाला जनतेने निवडून दिले. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस, दत्ताराम देसाई, मदन राणे यांनी तिलारी घाटातील एस टी बस बाबत चंदगड तालुक्यातील
सामाजिक नेते संग्राम कुपेकर यांच्या मार्फत हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन स्वागत केले.