नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ, दि. २५ डिसेंबर
काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला आरएसएन हॉटेल ते संत राऊळ महाराज चौक हा रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्यावर असणारे महावितरणचे तीन खांब मध्यभागी ठेवण्यात आले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन कुडाळ नगरपंचायतचे सभापती मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निवेदन दिले होते. या निवेदनाला प्रतिसाद देत सदर पोल हटवण्यात आले.