सावंतवाडी, दि. २५ डिसेंबर
गुळदूवे नदीपात्र लोकांनी स्वच्छता अभियान राबवत पूर धोका टाळण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाची वाट पाहत लोक बसलेले नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मळेवाड – गुळदूवे नदीपात्रात झाडी वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे पूर येण्याचा धोका संभवत असतो. पुरामुळे शेतीत पाणी घुसते व मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासन स्तरावर उपाय योजना व्हावी ही विनंती करूनही काहीच उपाययोजना न झाल्याने अखेर गुळदुवे येथील गावकरीच आज एकत्र आले आणि त्यांनी नदीपात्रात साफसफाई मोहीम राबवली.
या साफसफाई मोहिमेमध्ये रुपेश धरणे, रवींद्र धरणे, नंदू धरणे, प्रशांत खोबरेकर, कमलकांत कोल्हे , दिलीप मामलेकर मुकुंद धरणे, अरुण धरणे , रघुनाथ धरणे, रमाकांत शेटकर, संतोष सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.