कुडाळ, दि. २५ डिसेंबर
डोळ्याचे पारणे फेडणारे विविध लक्षवेधी देखावे, चित्ररथ, भव्य शोभायात्रा अशा सांस्कृतिकमय वातावरणात पहिल्या पिंगुळी महोत्सव २०२४ ला शानदार सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात बैलगाडी सजावटसोबत कळसुत्री बाहुल्यांच्या विविध कलाविष्काराने या सोहळ्यात रंगत आली. ग्रामदैवत श्री देव रवळनाथ, प. पु. संत राऊळ महाराज मठ ते बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण महोत्सवपर्यंतही भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
ग्रामपंचायत पिंगुळी, साईकला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव २०२४ ला आजपासून बॅरिस्टर नाथ क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात झाली. भव्य शोभायात्रेने विविध लक्षवेधी देखाव्यासह या सोहळ्याला प्रारंभ झाला. २७ डिसेंबरपर्यंत हा पिंगुळी महोत्सव चालणार आहे. या मिरवणुकीत पिंगुळी गावाची महती सांगणारे चित्ररथ, ढोलपथक बैलगाडी देखावे, पांगुळ बैल ही विविधता महोत्सवात होती. या मिरवणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, महोत्सव प्रमुख सरपंच अजय आकेरकर, बॅरिस्टर नाथ पै संस्था अध्यक्ष उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, साईकला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम, अमित तेंडोलकर, विकास कुडाळकर, भगवान रणसिंग, रणजीत रणसिंग, राजन पांचाळ, हेमंत जाधव साईराज जाधव, रुपेश पिंगुळकर, संतोष पिंगुळकर, छोटू दळवी पोलीस पाटील सतीश माड्ये, वैभव धुरी, मंगेश चव्हाण, दीपक गावडे, बाबल गावडे, सचिन सावंत, दर्शन कुडव, मयूर लाड, निलेश प्रभू, राज वारंग, नाना राऊळ, समीर दळवी, संग्राम खानोलकर, सचिन पालकर, प्रसाद दळवी, अमृता गाळवणकर, दादा चव्हाण, मंगेश मसके, पिंगुळी ग्रामस्थ बचतगटाच्या महिला, विविध महिला मंडळे ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. या महोत्सवाची सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने झाली. यावेळी पिंगुळी गावातील ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजतागायत असणाऱ्या आजी-माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार पार पडला. देश-विदेशात पोचलेल्या ठाकर समाजाची कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल सादरीकरण सोहळा झाला. नवीवाडी महिलांचे टाळनृत्य हा अनोखा कार्यक्रम यावेळी झाला. उद्या गुरुवार, २६ डिसेंबरला गणेशवंदना सायंकाळी ६ वाजता “मुक्काम पोस्ट कॉमेडीवाडी” हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये टीव्ही कलाकार विश्वजीत पालव, कल्याणी साखळूनकर आणि मुकेश जाधव या कलावंताचा समावेश आहे. रात्री ८ वाजता नृत्य महोत्सव २०२४ होणार आहे. शुक्रवार, २७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता गणेश वंदना त्यानंतर पिंगुळी गावातील गायक, वादक,बीनृत्य कलाकार यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता संपूर्ण भारतात नावाजलेला मुंबईतील कलाकारांचा प्रसिद्ध बँड “अभंग रिपोस्ट” हा कार्यक्रम होणार आहे. दरदिवशी समारोपवेळी लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. दरम्यान, या महोत्सवात विविध असे ८० स्टॉल सहभागी झाले आहेत. उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने विविध स्टॉल आहेत. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील ऑटो इंडस्ट्रियल स्टॉल या ठिकाणी आहेत.