सेवानिवृत्त सेवक संघातर्फे दीपक आडवणकर यांचा सत्कार

मालवण, दि. २५ डिसेंबर

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची सभा मंगळवारी ‘पेन्शनर्स डे’निमित्त येथील भरड दत्त मंदिर येथे झाली. यावेळी सेवानिवृत्त सेवक संघाला सहकार्य करणाऱ्या जिल्हा बँकेचे येथील व्यवस्थापक दीपक आडवणकर यांना पेन्शनर्स दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

यावेळी मालवण सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष अजित गवंडे, उपाध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, खजिनदार उदय मोंडकर, सहसचिव मंगेश शेर्लेकर, ज्येष्ठ सदस्य देवदत्त हडकर, हेमंत कोचरेकर, सुबोध केळुसकर, अनिल चव्हाण, अशोक ओटवणेकर, शशिकांन प्रभु सचिन गवंडे, महेश पाटील, रघुनाथ मोंडकर, सविता कोचरेकर, सावित्री मालवणकर, देवदत्त हडकर, मारुती सोनवडेकर, शलाका गावकर आदी उपस्थित होते.