देवगड,दि.६ फेब्रुवारी
विजयदुर्ग् पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हेमंत देवरे यांची पालघर येथे विनंती बदली झाली आहे. या रिक्त झालेल्या विजयदुर्ग प्रभारी पोलीस अधिकारी पदी मालवण पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीसि नरिक्षक मनोज सोनवलकर यांची विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. यापुर्वी त्यांनी गडचिरोली,सोलापूर,पंढरपुर या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. विजयदुर्ग पोलीस ठाण्याचा कारभार त्यांनी नुकताच स्वीकारला असून विविध संस्था व राजकीय पक्षांव्दारे त्यांचे स्वागत करण्यात आले.