वेंगुर्ला, दि. २५ डिसेंबर
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला तर्फे २८ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय मोफत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील इयत्ता ५वीमध्ये शिकत असलेले आणि शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेचा लाभ घेऊ शकतील. या परीक्षेसाठी १४ केंद्र निश्चित केली असून शिरोडा केंद्रात शिरोडा नं.१ आणि रेडी नं.१, आरवली केंद्रात आरवली नं.१ आणि आसोली नं.१ आणि मातोंड केंद्रात मातोंड बांबर क्र.५ आणि पेंढ-याचीवाडी अशी अतिरिक्त केंद्र ठरवण्यात आली आहेत. त्या त्या केंद्राची जबाबदारी शिक्षक समिती पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पहिला पेपर सकाळी ८ ते ९.३० या वेळेत तर दुसरा पेपर सकाळी १० ते ११.३० या वेळेत घेतला जाणार असून शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत परीक्षेचा लाभ घ्यावा असे तालुका शाखेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.