जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला, दि. २५ डिसेंबर

वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे १९ जानेवारी रोजी इ.आठवी ते बारावी या गटासाठी सिधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दि.१९ रोजी सकाळी ९.३० वा. ‘इलेक्ट्रिक वाहने (ई-व्हेईकल) या विषयावर कै.ज.बा.आरोसकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा होणार असून स्पर्धकाने ७ मिनिटांमध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. यातील प्रथम तीन क्रमांकांना रू.५००, ४०० ३०० आणि प्रशस्तीपत्रे देण्यात येतील. तसेच याच दिवशी सकाळी ९.३० वा. ‘अभिजात मराठी‘ या विषयावर कै.मनोहर शांताराम भांडारकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा होणार असून स्पर्धकाने ७ मिनिटांमध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. यातील प्रथम तीन क्रमांकांना रू. १ हजार, ८००, ५०० व प्रशस्तीपत्रे देण्यात येतील. स्पर्धेसाठी माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातून तीन स्पर्धकांना भाग घेता येईल.

मुख्याध्यापक, पालक किवा विद्यार्थी यांनी दोन्ही स्पर्धेसाठीची नावनोंदणी संस्थेच्या कार्यालयीन वेळेत १५ जानेवारीपर्यंत करावी असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८२७५६६७०९० यावर संफ साधावा.