देवगड, दि. २५ डिसेंबर
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे . या शाळेमधून माझी जडण घडण झाली व त्यातूनच मी घडलो असे उदगार माजी विद्यार्थी डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी शेठ म.ग. हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी काढले. .
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्तप्रसाद सावंत ,स्थानीय समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे , स्थानीय समिती सदस्य विलास रुमडे , दयानंद पाटील प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर ,पालक – शिक्षक संघातील पदाधिकारी सौ. नमिता बलवान, सौ. मुग्धा भिडे , मंगेश हिंदळेकर, शाळेचा मुख्यमंत्री चैतन्य कोयंडे ,सांस्कृतिक मंत्री हर्षदा कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे तसेच शाळेतील इंग्रजी क्लब मार्फत आयोजित इंग्रजी शैक्षणिक साहित्य , प्रतिकृती , गणित प्रतिकृती , किल्ले प्रतिकृती प्रदर्शन या सर्वांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी विविध विषय समित्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा व शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवात
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता ५ वी ते ६ वी मधून उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेदांत राजेंद्र खवळे व तेजस्वी विजय कारेकर, इयत्ता ७ वी ते ८ वी मधून मुस्ताज रिजवान खान व जान्हवी गणेश सारंग, इयत्ता ९ वी ते १० वी मधून आराध्य विशाल चौगुले व बुशरा कय्यूम होलसेकर याचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला. उच्च माध्यमिक स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडामहोत्सवात यश संपादन केलेच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देवून गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त राखण्याचे आवाहन अध्यक्षीय मनोगतात प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.निशा दहिबावकर यांनी केले. या प्रास्तविकेत शाळेत राबवलेले विविध उपक्रम ,क्रीडाक्षेत्रात होणारी प्रगती , गुणात्मक प्रगती यांचा आढावा घेतला . बक्षिस वाचन स्वरा कोयंडे व ज्योती कदम यांनी केले. सुत्रसंचालन सागर कर्णिक यांनी तर आभार ज्ञानेश्वर कुंभरे यांनी मानले . त्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सायंकाळच्या वेळी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी स्वयंमसेवकांचे उत्तम सहकार्य लाभले.