जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कासार्डे हायस्कूल व कॉलेज उपविजेत्या पदाचे मानकरी

सहा खेळाडूंची क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

-स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गची एसएसपीएम येथे आयोजित आंतर शालेय मैदानी स्पर्धा

तळेरे, दि. २५ डिसेंबर

स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित आंतर शालेय आणि ज्युनिअर कॉलेज मैदानी स्पर्धा एसएसपीएम इंजीनियरिंग कॉलेज कणकवली येथे दि.22.12.2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे चे 29 खेळाडू सहभागी होते त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप दुसऱ्या क्रमांकाने जिंकली.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण,रौप्य व कांस्य पददकांसह प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

६ खेळाडुंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

क्रॉस कंट्री मध्ये 17 वर्षाखालील मुले कु.ओमकार चव्हाण- प्रथम, प्रथमेश पवार -द्वितीय क्रमांक आला आहे, याच प्रकारात 18 वर्षाखालील मुलांच्या गटात विश्वास चव्हाण- प्रथम क्रमांक, सुरज तांबे- द्वितीय,तर 20 वर्षा खालील मुलांच्या गटात सुरज राठोड- पाचवा आणि सोनू पवार सहावा आलाआहे.या सर्व ६ खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
………
मैदानी स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात कु.भक्ती लाड -लांब उडी व 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक.कु.वैष्णवी कातकर 100 मीटर धावणे- द्वितीय ,गौरवी राणे 50 मीटर धावणे- द्वितीय आणि लांब उडी -तृतीय ,कु.आर्या तळेकर लांब उडी -द्वितीय ,तसेच वरील सर्व मुली रिले स्पर्धेतही प्रथम आल्या आहेत. मुलांमध्ये प्रथमेश तेली लांब उडी -प्रथम ,200 मीटर धावणे -तृतीय, तसेच अथर्व सावंत, प्रथमेश तेली, स्वयं सावंत ,ध्रुव शेट्ये यांचा 100×4 रिले प्रकारात- तृतीय क्रमांक आला. 17वर्षाखालील गटात प्रथमेश पवार गोळा फेक- प्रथम, यासिर साखरकर गोळा फेक -द्वितीय, यश धुरी 80 मीटर -द्वितीय ,100 मीटर -तृतीय ,अथर्व कदम लांब उडी -तृतीय ,तसेच 100×4 रिले स्पर्धेत आर्यन पोयरेकर, यश धुरी, श्रेयश कुडतरकर, अथर्व कदम यांच्या संघाचा प्रथम क्रमांक आला आहे.
19 वर्षा खालील मुले मुली गटात कु.सानिया पाळेकर 80 मीटर धावणे-प्रथम, 100 मीटर धावणे -द्वितीय, लांब उडी -द्वितीय, कु.नेहा कदम 100 मीटर धावणे -प्रथम, लांब उडी -प्रथम 200 मीटर -तृतीय,कु.संजीवनी सावंत ८० मीटर धावणे- द्वितीय, 100 मीटर धावणे -तृतीय,कु.पूर्वा गुरव 200 मीटर धावणे- प्रथम, कु.प्राजक्ता मेस्त्री 200 मीटर धावणे- द्वितीय, तसेच कु.प्राजक्ता मेस्त्री, कु.पूर्वा गुरव कु. सानिया पाळेकर व कु.नेहा कदम 100×4 रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे
. मुलांमध्ये विराज इंदप 200 मीटर -तृतीय, आर्यन् तारी गोळा फेक -प्रथम क्रमांक तसेच रीले स्पर्धेत अथर्व गुरव, दीपक जाधव ,सिद्धांत खांडेकर,विराज इंदप या संघाचा प्रथम क्रमांक आला आहे .
विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन तसेच संपूर्ण संघाला उपविजेतेपदाचे जनरल चॅम्पियन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट
२९ खेळाडूंनी तब्बल ४५पदकांची केली लयलूट…
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहभागी एकूण २९ पैकी २५ खेळाडुंनी सुवर्ण, १० रौप्य आणि १० कास्यपदक जिंकून संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिली जाणारी द्वितीय क्रमांकाच्या जनरल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्रा.दिवाकर पवार,श्री यशवंत परब, प्रा ममता डांगमोडेकर, प्रा विनायक पाताडे, प्रा.ऋषिकेश खटावकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय मारकड तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.