राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘जागो ग्राहक जागो!’ स्पर्धेचे आयोजन
तळेरे, दि. २५ डिसेंबर
२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवली आयोजित तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात ‘जागो ग्राहक जागो’ या विषयावर कासार्डे ज्युनि. कॉलेजचा ओंकार मेस्त्री याने प्रथम पटकावला तर याच कॉलेजच्या सृष्टी खानोलकर हिने द्वितीय व आमिषा लिंगायत हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक गटात ‘वस्तूंची खरेदी व विक्री’ या विषयावर पोस्टर सादर केलेल्या कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या कल्पेश निकम याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली शाखेचे सहसचिव प्रा.विनायक पाताडे व कला विभागाचे शिक्षक श्री सागर पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे व नायब तहसीलदार श्री.वरक यांनी कणकवली येथे गुणगौरव केला.यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ,मंडल अधिकारी संतोष नागावकर, पुरवठा विभागाचे नितीन ढाके, सचिव पूजा सावंत प्रा.विनायक पाताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील,तालुका अध्यक्षा श्रद्धा कदम यांनी अभिनंदन केले.