दोडामार्ग,दि. २५ डिसेंबर
साटेली भेडशी सुतारवाडी येथील विवाहित तरुण कृष्णा उर्फ गिरी गोपाळ मयेकर वय वर्षे ५२ या तरुणाचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू होण्याची दुदैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तो दुपारी घरी न आल्याने सायंकाळी पाच वाजता शोध घेण्यासाठी काही नातेवाईक गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता कृष्णा मयेकर याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
साटेली भेडशी सुतारवाडी येथील कृष्णा मयेकर हा परमे रोड येथे लागून असलेल्या फटी धर्णे यांच्या मालकीच्या जमीनीत वाढलेल्या गवताला आग घालून जमीन साफसफाई करायला सांगितले होते. त्यामुळे दुपारी कृष्णा मयेकर हा शेत जमीन बागायती मध्ये आग लावून गवत जाळणे सुरू होते. मात्र दुपारची वेळ असल्याने वाऱ्यामुळे आग भडकली धूर तसेच आगीच्या ज्वाला यामुळे तो गुदमरून खाली कोसळला. आणी आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. यावेळी जवळपास कोणी नाही. शिवाय जमीन मालक देखील उपलब्ध नव्हता यामुळे तो पडला तिथे पडला.
काही गवताचा भाग जळत शरीरा बरोबर येऊन अंगाचा काही भाग कपडे आगीत जळाले. तो आजुबाजूला आग पेटत होती. शेतात आग घालायला गेलेला गिरी घरी आला नाही म्हणून शोध घेण्यासाठी काही जण सायंकाळी शेतात गेले असता कृष्णा मयेकर हा शेत जमीनीत मृत अवस्थेत आढळून आला.
या नंतर याची माहिती पोलीस पाटील तसेच दोडामार्ग पोलिसांना कळविली.