सावंतवाडी, दि. २५ डिसेंबर
झाराप येथील हॉटेल आराध्य येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांना सिंधू रत्न योजनेतून 75 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेकडून 25 टक्के असे मिळून शंभर टक्के अनुदानाने अध्ययावत लॅपटॉप देण्याची मागणी सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करताना सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सोबत राजू तावडे रुपेश हिराप रुपेश पाटील सिताराम गावडे आनंद धोंड राजेश नाईक आदी यावेळी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत,तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर,अनंत जाधव सचिन रेडकर आदींची उपस्थिती होती विशेष म्हणजे या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर हेही उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पत्रकारांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले