सावंतवाडी दि.२६ डिसेंबर
नेमळे गावकर-कुंभारवाडी येथील श्रीदत्त-अनघालक्ष्मी व श्री योगेंद्रनाथ महाराज मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त “श्रीदत्त-अनघालक्ष्मी मंदिर सेवा समिती” आणि “आॅन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत नेमळे (गावकर-कुंभारवाडी) ता. सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेमळे पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्रीदत्त-अनघालक्ष्मी मंदिर सेवा समितीच्या वतीने श्री. सत्यवान सोनसुरकर यांनी केले आहे.
रक्तदानासाठी येणार्या रक्तदात्यांनी नितीन पांगम (8390122690), विजय सोनसुरकर (9168170254), श्री. सिद्धार्थ पराडकर (9422967249), श्री. दिनेश गावडे (9420740444) श्री. बाबली गवंडे (8390905269) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन “आॅन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” मार्फत करण्यात आले आहे.