भविष्यात अनेक उपक्रमांमध्ये पिंगुळी गाव अग्रेसर असेल !

उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत यांचे पिंगुळी महोत्सवात प्रतिपादन

कुडाळ,दि.२६ डिसेंबर

पिंगुळी गावाचा पहिला महोत्सव हा आनंद लुटणारा, आनंद देणारा महोत्सव आहे. भविष्यात आपल्या सिंधुदुर्गासाठी एकाच विचाराचे खासदार, आमदार लाभल्यामुळे जिल्ह्यासह पिंगुळी गावाचा सर्वांगीण विकास दूर नाही. भविष्यात अनेक उपक्रमांमध्ये पिंगुळी गाव अग्रेसर असेल. येथील एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत यांनी पिंगुळी महोत्सवात करुन हा महोत्सव सर्वांसाठी विशेष पर्वणी आहे असे सांगितले
ग्रामपंचायत पिंगुळी, साईकला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव २०२४ ला २५ डिसेंबरपासून बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्धाटन गुरुवर्य
का. आ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पदमश्री परशुराम गंगावणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत मसगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष अँड. संग्राम देसाई, तहसीलदार विरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, अमित सामंत, सीए सुनिल सौदागर, अँड अजित भणगे, अँड. श्रीनिवास नाईक,
सुंदर गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था अध्यक्ष  उमेश गाळवणकर, गजानन कांदळगावकर अविनाश वालावलकर, विकास कुडाळकर, गुरुनाथ गुरव,  दीपक पाटकर, सुनील  म्हापसेकर, दशरथ राऊळ, सरपंच अजय आकेरकर, संजय वेंगुर्लेकर, विजय दळवी, नीता राणे, मंगेश चव्हाण दीपक गावडे, संग्राम खानोलकर, भूषण तेजम, भगवान रणसिंग, अमित तेंडुलकर समीर दळवी, सतीश माड्ये, साईराज जाधव, मयूर लाड, राज वारंग, बाबल गावडे, शशांक पिंगुळकर, वैभव धुरी, राजा सिंगनाथ, दर्शन कुडव, रणजीत रणसिंग, निलेश प्रभू, छोटू दळवी विविध क्षेत्रातील मान्यवर पिंगुळीवासिय विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गट आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, पिंगुळी गावात पहिला भव्य दिव्य महोत्सव पाहून खूप आनंद झाला. या पिंगुळी गावाने प्लास्टिकमुक्तसह इतर उपक्रम राबविण्यासाठी केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. गावासाठी रुग्णवाहिका गरज आहे ही गरज ओळखून त्या ठिकाणी रणजीत देसाई व त्यांच्या टीमने टाकलेली  पावले निश्चितच गावाच्या सर्वांगीण विकासात भर टाकणारी आहेत. पिंगुळी गाव विकासाकडे वाटचाल करतानाच विशेष अभिमानाने सांगावेसे वाटते की, जिल्ह्यात एकाच विचाराचे खासदार आमदार असल्याने आता  जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह पिंगुळी गावाचा सर्वागिण विकास दूर नाही तसेच राज्यात व केंद्रात एकाच विचाराची सत्ता असल्यामुळे जिल्ह्यासह पिंगुळी गावाचा विकास गतिमान होणार असल्याचे सांगितले गुरुवर्य का. आ. सामंत यांनी कुडाळ शहराला लागून असणारे पिंगुळी गाव आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. एक ना एक दिवस हा पिंगुळी गाव शहर होईल आणि शहर होताना  विकासाच्या प्रक्रियेत असणारा हा गाव या गावासाठी निधी येईल, विविध उपक्रम होतील हे सांगताना आपण उत्तम नागरिक बनावे आणि आपल्या या नागरिकपणामुळे समाजाची, देशाची सेवा करता यावी असे सांगितले. पद्मश्री गंगावणे यांनी
आपली पिंगुळी फार मोठी आहे. या सांस्कृतिक पिंगुळीत अनेक भारतरत्न आहेत आणि ही भारतरत्ने  जागतिक पातळीवर पोहोचलेली आहेत. लोककलाकार गणपत मसगे यांनी पिंगुळी गाव रत्नांचा गाव आहे. अध्यात्मिक, लोककला, राजकीय प्रत्येक क्षेत्रात पिंगुळी गाव अग्रेसर राहिलेला आहे. येथील  रत्नांनी या महोत्सवाचे आयोजन करून हा महोत्सव जगासमोर आणला असे सांगितले प्रास्ताविकात रणजित देसाई यांनी पिंगुळी गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महोत्सवाच्या माध्यमातून पिंगुळी गांव जगाच्या नकाशावर जाईल अनेक ठिकाणी महोत्सव होतात. आपल्या कुडाळमध्ये  लायन्स रोटरीचे महोत्सव होतात. भविष्यात गावाच्या विकासासाठी प्लास्टिक मुक्त पिंगुळीसह विविध उपक्रम हाती घेणार असल्याचे जाहीर केले. यावेळी पिंगुळी ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजतागायत कार्यरत सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अर्जुन चव्हाण, नझीर खुल्ली, श्याम वराडकर, विकास कुडाळकर, निळकंठ राऊळ, भारती रणसिंग, कोमल सावंत, राजन पांचाळ, निर्मला पालकर, अजय आकेरकर, उपसरपंच प्रसाद दळवी, किशोर पिंगुळकर, मिलिंद परब, सागर रणसिंग आदींचा समावेश होता. यावेळी अँड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंगुळी गावाच्या वतीने दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांचे वडील सुंदर गाळवणकर, दिल्ली दरबारी सन्मान झालेले केरसुणी कारागीर भाई धुरी यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात पिंगुळी गावची सुकन्या कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने झाली. त्यानंतर माणसी माडये व कुमारी सलोनी यांनी गणेशवंदना केली. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात श्री विठ्ठलाच्या नावाचे नामकरण नामस्मरण करणारे कारण नृत्याविष्कार नवीवाडी येथील महिलांनी सादर केला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित खास आकर्षण पपेट शो शिवदास मसगे कृष्णा मसगे व त्यांच्या सहकलावंतानी केला.