कलमठ ग्रामपंचायत मध्ये हळदीकुंकू समारंभ

विधवा महिलांचा देखील केला ग्रामपंचायतीने सन्मान

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने महिला स्नेही संकल्प अंतर्गत अनेक उपक्रम राबवत असताना हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील विधवा महिलांचा सुद्धा यावेळी सन्मान म्हणून हळदीकुंकू समारंभात सहभागी करून घेतले व खऱ्या अर्थाने महिलास्नेही गाव म्हणून कलमठ ग्रामपंचायत पुढे येत आहे अश्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या प्रीती मेस्त्री, हेलन कांबळे, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, इफ्फत शेख, नजराणा शेख, ज्योती आमडोसकर, अंकिता राणे उपस्थित होते.