भविष्यात नैसर्गिक शेतीचे महत्व वाढणार- ब्रिगे. सुधीर सावंत
देवगड,दि.२६ डिसेंबर
किर्लोस कृषि विज्ञान केंद्र मार्फत देवगड तालुक्यातील नैसर्गिक शेतीच्या शेतकरी गटांचे दोन दिवसीय प्रशिक्षण किर्लोस येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचा शुभारंभ कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, देशात नैसर्गिक शेतीची चळवळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उभी केली असून गेली आठ वर्षे नैसर्गिक शेतीचा प्रसार व प्रचार प्राधान्याने करत आहोत. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून किर्लोस कृषि विज्ञान केंद्र शेतकर्यांॉना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन करून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवले आहे. भविष्यात नैसर्गिक शेतीचे महत्त्व वाढणार असून शेतकऱ्यांनी या मोहिमेत भाग घेवून आपली उन्नती करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. पुढे ते म्हणाले चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चांगल्या आरोग्यासाठी सकस अन्नाचे सेवन करा. सकस अन्न नैसर्गिक शेतीतून पिकविण्यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला शासन मान्यता मिळाल्यामुळे आता शेती नैसर्गिक शेती प्रमाणीकरण करता येणार आहे. या संधीचा फायदा शेतकर्यांमनी करावा असे ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले.
या प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण कुरकुटे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, मंडळ कृषी अधिकारी डॉ. बि. एम. लांबाडे, निकेत राणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापुरकर, डॉ. केशव देसाई,विवेक सावंतभोसले व कार्यक्रम सहाय्यक सुमेधा तावडे यांनी व्याख्यान व चित्रफिती द्वारे तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र व्यवस्थापक विवेक सावंतभोसले व वरिष्ठ संशोधन सहाय्यक सिद्धेश गावकर यांनी नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मितीची प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आली. प्रशिक्षणाचे समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत होते.