जगावर नेतृत्व करायचे असेल तर परिपूर्ण व्यवस्थित शिक्षण घेणे ही काळाची गरज…-अध्यक्ष मनीष दळवी

बांदा,दि.२६ डिसेंबर
जगावर नेतृत्व करायचे असेल तर परिपूर्ण व्यवस्थित शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. राज्यात सर्वात हुशार मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बांदा नवभारतचे योगदान हे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित 36 व्या आंतर शालेय क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी यमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये श्री. दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माहीम मुंबईचे आमदार महेश सावंत, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरस्कर, अध्यक्ष कल्पना तोरस्कर, खजिनदार वैभव नाईक, कार्यकारिणी सदस्य तथा समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरस्कर, समन्वय समिती सदस्य बबन गवस, समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष सिताराम गावडे, माजी मुख्याध्यापक अन्वर खान, डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, अजय तोरस्कर, मुख्याध्यापक नंदू नाईक, सर्व भगिनी शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे तर क्रीडाहित करून प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. तोरस्कर यांच्या हस्ते मनीष दळवी व आमदार महेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था संचलित सर्व शाळांच्या मुलांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रश्मी नाईक यांनी केले. आभार नंदू नाईक यांनी मानले.