सावंतवाडी,दि.२६ डिसेंबर
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे संस्था अध्यक्ष श्री. दिगंबर सखाराम मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे मातोंड गावचे सुपुत्र माहिम दादर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व विद्यालयास लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख पाहुणे श्री नारायण तुकाराम हिराप- सरपंच सोनुर्ली ग्रामपंचायत यांनी विद्यालयाला रोख ५ हजार रुपयांची देणगी दिली.
प्रमुख पाहुणे अशोक आपा सावंत सेवानिवृत्त पी. एस. आय अधिकारी यांच्या हस्ते स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यांनी मुलांना स्पर्धा परीक्षा तयारी करावी, वाचणाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले. विद्यालयाला रोख ५ हजार रुपयांची देणगी दिली.
प्रमुख पाहुण्याचा सत्कार संस्था संचालक शंकर भिकाजी गांवकर यांनी शाल श्रीफळ देऊन केला. या प्रसंगी व्यासपीठावर सर्व संस्था संचालक श्री. आनंद चंद्रकात नाईक उपाध्यक्ष, श्री नारायण बापू मोर्ये सचिव, श्री नागेश ननी गांवकर सहसचिव, सौ. भारती भदू गांवकर खजिनदार, तसेच संस्थेचे संचालक शंकर गावकर, लक्ष्मीदास ठाकूर, मुकुंद परब, दिपक नाईक, भरत गावकर, गोविंद धडाम, शरद धाऊसकर, तेजस गावकर, उदय गाड, सदाशिव राऊळ, सल्लागार गोविंद मोर्ये, शालेय समिती अध्यक्षा सौ. आनंदी सिताराम गांवकर, गावचे प्रमुख मानकरी गणेश (भाई) गांवकर, पालक – शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री दिपक नाईक उपस्थित होते. आरोंदा हायस्कूल मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप मारुती सावंत सहा. शिक्षक, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. अरुण विश्वनाथ तेरसे यांनी तर आभार श्री. पांडुरंग गोपाळ काकतकर सहा. शिक्षक यांनी मानले. मुलांच्या कार्यक्रमाचे निवेदन कु. समिक्षा धुरी, कु. क्षमिका मालपेकर यांनी केले.