वैभववाडी,दि.२६ डिसेंबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या अवमानकारक वक्त्यव्याचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तसीलदार वैभववाडी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना देण्यात आले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच संसदेत संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अविवेकीपणे केलेले वक्तव्य हे त्यांचा अवमान करणारे असून देशाला लांचनास्पद आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असून महामानवाचा अवमान करणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार, अर्जुन कदम, सचिन भोसले, अजित कदम, प्रवीण भोसले, प्रीतम जाधव, सुहास जाधव, विजय पवार,नितीन कांबळे, प्रवीण जाधव,चंद्रकांत जाधव बौद्ध सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.