देवगड,दि.२६ डिसेंबर
किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे,त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे या उद्देशाने २६ डिसेंबर २०२४ हा दिवस संपूर्ण देशभरात “ वीर बाल दिवस “ म्हणून साजरा केला जातो.असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले.
गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या “ वीर बाल दिवस “ कार्यक्रमात ते प्रमूख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर .मंगेश गिरकर ,.मोहन सनगाळे ,.सुजित फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
वीर बाल दिवसाचे औचित साधून दि.१६ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळा-शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी ६ ते ८ व ८ ते ११ तसेच ११ते १४ व १४ ते १८ वयोगटासाठी गोगटे प्रशालेत निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे स्वागत ,सूत्रसंचालन व आभार व्यक्त .मंगेश गिरकर यांनी केले.