सावंतवाडी दि.२६ डिसेंबर
विद्यार्थी परिषद प्रभावात्मक काम करत राहिल, आणि त्यामुळे सदस्य संख्या एक कोटी वर लवकरच गाठता येईल. शिक्षणशी क्षेत्रात विद्यार्थी परिषद प्रभावात्मक काम करत असल्याने जगभर ही संघटना पोहचली आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा बँक अध्यक्ष शरद गांगल यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनी कक्ष द्धिपप्रज्वलीत करून उद्घाटन ठाणे जनता सहकारी बँक अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले नाॅलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, निमंत्रित सदस्य डॉ वर्धराज बापट, कोकण प्रांत सहमंत्री आसावरी आवटे आदी उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनाची पाहणी केली.
शरद गांगल म्हणाले, विद्यार्थी परिषद व कार्यकर्ते विविध कार्यक्रमांतून चळवळ उभी राहिली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहत प्रगती झाली. प्रदर्शनीत विविध पातळ्यांवर सादरीकरण करण्यात आले आहे. आजचा विद्यार्थी विद्यार्थी परिषद मांडवा खालून जातो तो प्रशिक्षण घेत पुढे जातो. या ठिकाणी जबाबदारीची जाणीव निर्माण होते. जबाबदारी पेलण्यासाठी ताकदीने उभे राहता येते. विद्यार्थी परिषद लिडर शिप चा दर्जा यातून दिसतो. जिवंत संघटना लर्निग आयोजन असल्याने जिवंतपणा आहे. कौशल्यासाठी शास्त्री आणि आपण मेस्त्री स्विकारले आहे. राजकारण विरहित फक्त शिक्षक व विद्यार्थी संघटना फक्त चर्चा विद्यार्थी करू शकतो. अधिवेशनाला अहिल्याबाई होळकर नांव दिले आहे तर प्रदर्शनीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर नामकरण केले आहे. आदर्शाचां मागोवा घेऊन विद्यार्थी परिषद वाटचाल कौतुकास्पद आहे. विविधरूपी काम विद्यार्थी परिषद करत राहिल्यास एक कोटी सदस्य संख्या व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात विद्यार्थी परिषद प्रभावात्मक काम करत राहिल.
डॉ वर्धराज बापट म्हणाले, सिंधुदुर्ग निसर्ग रम्य पवित्र शूर वीर त्याग भूमित आनंद होतो आहे. विद्यार्थी व प्राध्यापक सदस्य असलेल्या या विद्यार्थ्यी परिषद सक्रिय आहेत. देशात ७०० च्या वर जिल्हे आहेत तेथे शाखा आहेत. अंदमान निकोबार बेटासह भारतात सर्वत्र शाखा आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तेथे अन्याय दूर करण्यासाठी सतत साकारत्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत आहे. रस्त्यावर उतरून नव्हे तर योग्य ठिकाणी प्रश्न मांडत प्रश्न कसा सुटेल तेही मांडतो. आंदोलन करुन थांबत नाही तर विद्यार्थांचा विकास डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो. भारतातून विदेशात जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या वाढत आहे, तेथेही विद्यार्थी परिषद कार्यरत आहे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. जगभरातील भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहोत. देश व राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनात ठराव मंजूर करते. काळानुरूप योग्य निर्णय घेतला जातो.
अच्युत सावंत भोसले म्हणाले, शैक्षणिक कौशल्य, नवीन शैक्षणिक पाॅलीसी जाणून घ्या. प्रगतशील भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हा.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष तथा अधिवेशन स्वागत समिती अध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले,माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, राजू राऊळ, डॉ सितावरी, कोकण प्रांत अध्यक्ष संकल्प फळदेसाई, चिन्मयी प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर नगरीत अधिवेशन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन दि २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी येथे संपन्न होत आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज सभागृहामध्ये शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असणार आहेत.
या अधिवेशनामध्ये अभाविप परिवर्तनकारी छात्र आंदोलन, आनंदमय सार्थक छात्र जीवन, विकसित कोकण आणि समृदध कोकण ही भाषण सत्रे होणार आहेत. तसेच विविध प्रस्तावांवर चर्चा करून प्रस्ताव संमत केले जातील.तर या अधिवेशनाच्या निमित्ताने दि. २८ डिसेंबर रोजी सांयंकाळी ४ वाजता राजवाड्यापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवरून जात गांधी चौक येथे पोचल्याव सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे स्वागत समितीचे सचिव अतुल काळसेकर यांनी बोलताना सांगितले.