चोरीचा छडा तातडीने लावा जेष्ठ नागरिक संघातर्फे आचरा पोलीसांना निवेदन

आचरा,दि.२७ डिसेंबर (अर्जुन बापर्डेकर)
आचरा परीसरात वाढत्या चो-यांमुळे घरात एकट्या दुकट्या राहणारया जेष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून तातडीने चोरीचा छडा लावण्याची मागणी फेस्काॅन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचे अध्यक्ष अशोक कांबळी ,कार्यवाह जेएम फर्नांडिस बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर ,लक्ष्मण आचरेकर, प्रकाश पुजारे ,श्रीमती मनाली फाटक ,भिकाजी कदम आदी उपस्थित होते
या निवेदनात वायंगणी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर यांच्या घरात घुसून अज्ञान चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून फरार झाले आहेत .तसेच यापूर्वी आचरा बाजारपेठेतील सुवर्णकार कारेकर यांच्या दुकानात चोरी करून चोरटे प्रसार झाले होते. त्यामुळे एकटे दुकटे राहणारे जेष्ठ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पोलीसांकडून चोर पकडण्यासाठी कोणती कार्यवाही झाली याबाबतची माहिती ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात यावी अशी लेखी विनंती आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आली.