कसालच्या तन्वी कदमचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश!

 मसुरे,दि.२७ डिसेंबर (झुंजार पेडणेकर)

कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ.श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. ति एकाच वेळी दोन ग्रुप घेवून या परीक्षेस बसली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
ती डॉन बॉस्को हायस्कूल ओरोसची विद्यार्थिनी होती.दहावीच्या परीक्षेत तीने १००% गुण मिळविले होते. तसेच मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ति ९२% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती तसेच ती बी.कॉम.परीक्षेतही टॉपर होती.
सातत्याने शैक्षणिक वाटचालीत तिने यापूर्वी खेळ,सांस्कृतिक विभाग आणि अभ्यास या क्षेत्रात यश मिळविले होते.
आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली क्षेत्र कोणतेही असो जिद्द, चिकाटी,मेहनत,सातत्य,आणि एकाग्रता यावर ते अधोरेखित करता येते. हा आई वडिलांनी दिलेला आत्मविश्वास आणि गुरूवर्यांचे मार्गदर्शन यामुळेच मला यश मिळू शकले.
या अभ्यासक्रमातील अर्टिकलशीप तिने मुंबई येथील सीए यांचेकडी पूर्ण केली.
अभ्यासातील सातत्य ठेवल्यास अशा अवघड परीक्षा आपण सहज उत्तीर्ण हवा होवु शकतो असा संदेश यानिमित्ताने तिने सीए परीक्षेस प्रविष्ट असलेल्या विद्यार्थी वर्गाला दिला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई वडिलांनी केलेला त्यांच्या जीवनातील प्रवास आणि माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा याची छोटीशी भेट मी त्यांना दिली आहे असेही ती म्हणाली.
देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटट या परीक्षेचा निकाल १३% लागला असून त्यात तन्वी हिने मिळविलेले यश अभिनंदनीय आहे
तिच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून आणि कदम परिवार यांच्या मित्रपरिवारातून तिचे अभिनंदन केले आहे
खासदार नारायण राणे आणि सौ निलम राणे यांनी फोन करून अभिनंदन केल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.