देवगड,दि.२७ डिसेंबर
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना देवगड तहसिलदार कार्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. देशाचे माजी पंतप्रधान,ज्येष्ठ अर्थतज्ञ यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे.
देवगड तहसिलदार लक्ष्मण कसेकर यांनी कर्मचारी वर्गाला एकत्र करून आपल्या दालनात शोकसभा घेतली. कसेकर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या शैक्षणिक जीवनक्रम ते देशाच्या विकास व आर्थिक जडणघडणीत असलेले योगदान याविषयी माहिती दिली. महसूल सहायक प्रदिप कदम यांनी १९९१ मधील खाजगी करण,उदारीकरण,जागतिकीकरण(खाऊजा) धोरणाची झालेली घोषणा व जागतिकीकरणामुळे देशात झालेले आर्थिक बदल याबाबत विवेचन केले. यावेळी महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, संगांयो नायब तहसिलदर सुरेंद्र कांबळे, पुरवठा नायब तहसिदार गुठे व सर्वकर्मचारी उपसस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना देवगड तहसिलदार कार्यालयात श्रध्दांजली अर्पण