“जल्लोष २०२५ “नववर्षाचे स्वागत ” पोलीस प्रशासन व व्यापारी पर्यटन संस्था , जल्लोष समिती सज्ज!

पोलीस निरीक्षक सोनवडेकर यांनी केली पार्किंग व्यवस्थेची पाहणी

देवगड,दि.२७ डिसेंबर 
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड व जल्लोष समिती आयोजित जल्लोष २०२५ नववर्षाचे स्वागत या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन देवगड वासीय आयोजक सज्ज झाले आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये व त्या योग्य ते वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने देवगड पोलीस प्रशासनाचे नियोजन झाले असून जल्लोष २०२५ या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने देवगड पोलिसांना कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी तसेच पार्किंग व अन्य समस्यांबाबत पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली .व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनिफ मेमन ,शामराव पाटील, सचिव मिलिंद मोहिते, दयाळ गावकर?मिलिंद खडपकर, दिनेश पटेल,बंटी कदम वाहतूक पोलीस प्रवीण सावंत उपस्थित होते या बैठकीत ३०व ३१ डिसेंबर २०२४ रोजी देवगड बीच या ठिकाणी पार पडणाऱ्या जल्लोष २०२५ स्वागत नवं वर्षाचे या कार्यक्रमाच्या आणि निमित्ताने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे त्याचबरोबर अति महत्त्वाच्या वाहनांकरता देखील एकेरी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे विशेषतः देवगड मांजरेकर नाका या मार्गावरून सायंकाळी नंतर देवगड पवन चक्की गार्डन पार्किंग ,जुने पोलीस स्थानक मैदान, व अन्य भागात अधिकाधिक पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. याबरोबरच देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्प जेटी या ठिकाणी पार्किंग सुविधा निर्माण करणयात आली आहे. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस प्रशासन मार्फत पोलीस, महिला पोलीस,होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.
या निमित्त सोमवार ३० डिसेंबर व मंगळवार ३१ डिसेंबर या दोन दिवशी विविध उपक्रमांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच देवगड बीच या ठिकाणी फूड स्टॉल ,आकर्षक विद्युत रोषणाई नववर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत त्यांच्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रसिकांना लाभणार आहे.
सोमवार दिनांक ३० डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोष २०२५ या सोहळ्याचे उदघाटन सायं ८ ते ९वा स्थानिक कलाकारांच्या कलाविष्कार, रात्री ९ वा. ऑर्केस्ट्रा “बेधुंद” गायिका संज्योती जगदाळे, (सुर नवा ध्यास नवा फेम) गायक गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर, गायिका व्हाईस ऑफ विनर
विभा सोबत सिंधू संकल्प कुडाळ चे डान्स परफॉर्मन्स , ३१ डिसेंबर सायंकाळी ७ ते ९ वा. स्थानिक कलाविष्कार रात्री ९.३० वा. ऑर्केस्ट्रा “जल्लोष” सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अक्षता सावंत गायक रवींद्र खोमणे(सूर नवा ध्यास नवा फेम) संगीतकार गायक स्वप्नील गोडबोले, गायक नवाब रात्रौ. १२ वा. जल्लोषपूर्ण फटाक्यांची आतषबाजी , विद्युत रोषणाई चे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या वर्षी पासून आदर्श कार्यकर्ता सन्मान स्व.संजय धुरी यांच्या नावे देण्यात येणार आहे.जल्लोष २०२५ ,नववर्षाचे स्वागत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन देवगड व्यापारी पर्यटन संस्था,व जल्लोष समिती च्या वतीने करण्यात आले आहे.