दिव्यांग खेळाडूंनी गाजवले मैदान देवगडच्या दिक्षा तेलीनें जिंकले दोन सुवर्णपदक

सावंतवाडी दि.२७ डिसेंबर
शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक कोल्हापूर येथे पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने पॅरालिंपिक चॅम्पियनशिप २०२४ या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या अॅथलेटिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगत्वावर मात करून उज्वल यश संपादन केले.सिंधुदुर्ग नें चार पदक दोन सुवर्णं, 1 रजत, 1 कास्य पदक जिंकले.

दिव्यांगाचा सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व DCCBI च्या पश्चिम भारत प्रमुख रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ कोल्हापुर येथे ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी रवाना झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी ४०० हून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा संघात स्मिता गावडे, दिक्षा तेली, श्रुती पाटील, जोस्पिन डिसोजा, प्राजक्ता गावकर व मुरलीधर घाडी हे खेळाडू सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा संघाच नेतृत्व करताना देवगड तालुक्यातील दिक्षा तेली हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोळा फेक मध्ये सुवर्ण पदक व थाळी फेक मध्ये सुवर्ण पदक, अशे दोन सुवर्ण पदक पटकवले व आगामी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. तसेच जोस्पिन डिसोजा या कुडाळ तालुक्यातील खेळाडूंनें थाळी फेक प्रकारात रौप्य पदक, व गोळा फेक प्रकारात कास्य पदक पटकवले.या खेळाडूंवर सिंधुदुर्ग वासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्यातील दिव्यांग बांधव,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मैडम,साहस संस्थेचे सर्व विश्वस्त, क्रीडा संकुल वेंगुर्ला चे प्रशिक्षक व पालक यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे व या स्पर्धेत सहभागी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.