सिंधुदुर्गनगरी,दि.६ फेब्रुवारी
सन 2022-23 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी दि. 8 फेब्रुवारीर्पंयत सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.
शासन निर्णयानुसार संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता Awards) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह नमूद कालावधीमध्ये दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत.
त्यानूसार विहिती नमून्यात सूचना व हरकती सादर करावे, असे क्रीडा विभागार्फत आवाहन करण्यात येत आहे