प पू संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा २८ डिसेंबर रोजी सावंतवाडीत

सावंतवाडी दि.२७ डिसेंबर 
तेली ज्ञातीचे आराध्य दैवत परमपूज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२५ पुण्यतिथी उद्या शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. यावर्षीचे पूजेचे मानकरी सौ व श्री श्याम निवेलकर दांपत्य असतील.
सावंतवाडी तेली समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने सावंतवाडी चंद्रभागा निवास संताजी नगर येथे होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास सकाळी ९ वाजता परमपूज्य सद्गुरू संताजी जगनाडे महाराज ब्राह्मणाद्वारे मूर्तिपूजन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते २.३० वाजता महाप्रसाद( भंडारा), दुपारी २.३० ते ४.३० वाजता विद्यार्थी पालक गुणगौरव व पारितोषिक वितरण, सायंकाळी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळ आजगावकर ,सचिव दिनेश आजगावकर, कार्याध्यक्ष महेश तेली व उपाध्यक्ष श्याम निवेलकर यांनी केले आहे