कामळेवीर बाजारपेठ येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सामुदायिक कार्यक्रम

सावंतवाडी दि.२७ डिसेंबर

कामळेवीर बाजारपेठ येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि 28 डिसेंबर 2024ते बुधवार दि 1जानेवारी 2025 या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सामुदायिक कार्यक्रम ह भ प रेगडे महाराज तसेच ह भ प कडव महाराज रा निळेली आंबेगाव यांच्या आश्रयाखाली आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वारकरी व ग्रामस्थ मंडळी च्या वतीने करण्यात आले आहे